नगर : हॉटेल अशोका ते सक्कर चौक वाहतुकीतबदल

File photo
File photo
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या फटाके, लाईट व साऊंड शो मुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आज (दि.19) सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल अशोका चौक ते सक्कर चौक दरम्यानच्या सर्व वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्याकडून औरंगाबादकडे जाणारी वाहने केडगाव बायपास, कल्याण बायपास, विळद बायपास, शेंडी बायपासमार्गे केडगाव बायपास चौक, कल्याण बायपास, नेप्ती नाका, दिल्ली गेट, अप्पू हत्ती चौक, पत्रकार चौक, एसपीओ चौक मार्गे वळविण्यात आली आहे.

तसेच, नगर रेल्वे स्थानकाकडून पुणे, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक कायनेटिक चौक- केडगाव बायपास मार्गे, कायनेटिक चौक, केडगाव बायपास, कल्याण बायपास, नेप्ती नाका, दिल्ली गेट, अप्पू हत्ती चौक, पत्रकार चौक, एसपीओ चौक मार्गे वळविण्यात आली आहे. औरंगाबादकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक शेंडी बायपास, विळद बायपास मार्गे एसपीओ चौक, पत्रकार चौक, दिल्ली गेट, नेप्ती नाका, कल्याण बायपास, केडगाव बायपास मार्गे वळविण्यात आली आहे. औरंगाबादकडून पाथर्डीकडे जाणारी वाहने एसपीओ चौक, न्यायनगर मार्गे, बेलेश्वर चौक, किल्ला चौक मार्गे जातील.

औरंगाबाद, मनमाडकडून जामखेड, सोलापूरकडे जाणारी वाहने शेंडी बायपास, विळद बायपास, कल्याण बायपास, केडगाव बायपास, अरणगाव बायपास, वाळुंज बायपास मार्गे जातील. शिल्पा गार्डन ते हॉटेल अशोका चौक दरम्यान उडाणपुलावर, तसेच वरील रस्त्यावर सर्व वाहने व पादचारी यांना प्रवेश बंद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news