कोपरगावमध्ये 15 जागांसाठी 38 जण रणांगणात

कोपरगावमध्ये 15 जागांसाठी 38 जण रणांगणात
Published on
Updated on

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव बाजार समितीची निवडणूक आ. आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, ठाकरे शिवसेना गटाचे नेते नितिन औताडे यांनी बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र शेवटपर्यंत तडजोड न झाल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. येत्या 30 तारखेला निवडणूक होवून त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येईल.15 जागांसाठी 38 जण रिंगणात उतरले असून, ते नशिब अजमावत आहेत.

एकूण 18 जागांसाठी 111 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी शेवटच्या दिवशी 63 उमेदवारांनी माघार घेतले. सोसायटी मतदार संघातून 11 जागा, ग्रामपंचायत मतदार संघातून 4, व्यापारी मतदार संघातून 2, हमाल मापाडी मतदार संघातून 1 जागा निवडून द्यावयाची आहे. सोसायटी मतदार संघातून 1413 ग्रामपंचायत मतदार संघातून 789 व्यापारी मतदार संघातून 198 तर हमाल मापाडी मतदार संघातून 86 असे एकूण 2476 जणांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते 2028 माघारीनंतर शिल्लक राहिलेल्या नामनिर्देशनपत्रांची यादी पुढील प्रमाणे, कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय सर्वसाधारण मतदार संघ अर्ज 16 (10 शेतकरी) साहेबराव लामखडे, साहेबराव रोहम, विष्णु पवार, किरण चांदगुडे, धनराज पवार, लक्ष्मण शिंदे, विजय जाधव, रंगनाथ गव्हाणे, शिवाजी देवकर, कैलास आसण, संजय शिंदे, रावसाहेब टेके, गोवर्धन परजणे, देवराम हेगडमल, राहुल गवळी, बाळासाहेब गोर्डे, कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय सहकारी संस्था महिला राखीव अर्ज 4 (3 शेतकरी) मिरा कदम, हिराबाई बारहाते, गयाबाई जावळे, माधुरी डांगे. कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय इतर मागासवर्ग मतदार संघ 3 अर्ज. (2 शेतकरी) गिरीधर पवार, खंडू फेफाळे, दत्ता बिडवे, कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय भटक्या जाती विमुक्ती जमाती मतदार संघ 1 रामदास केकाण, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण 4 अर्ज (3 शेतकरी) संजय दंडवते, प्रकाश गोर्डे, विष्णु पाडेकर, राजेंद्र निकोले ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिदृष्टया दुर्बल घटक 1 अर्ज अशोक नवले ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती- जमाती 1 अर्ज रावसाहेब मोकळ व्यापारी आडते मतदार संघ अर्ज 8 सुनिल काठारी, ललित धाडीवाल, ऋषिकेश सांगळे, संजय भट्टड, मनिष शहा, अहमद नजिम, संतोष ठक्कर, रेवननाथ निकम हमाल मापाडी मतदार संघ अर्ज 3 जलदिप शेळके, अर्जुन मरसाळे, रामचंद्र साळुंके हे आहेत.

ही निवडणूक अटी-तटीची होणार आहे. सहाय्यक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव ठोंबळ कामकाज पहात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोपरगाव बाजार समितीची पंच वार्षिक निवडणूक होत आहे तब्बल 7 वर्षानंतर
बाजार समिती निवडणुकीच्या राजकारणात उध्दव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, अपक्ष जोमात उद्धव ठाकरे शिवसेनेचे 7 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष 13 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस युतीचा पॅनल करणार असल्याचे सांगण्यात आले. काही अपक्ष उमेदवार ही आमच्या संपर्कात आहे. या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. संगमनेरमध्ये आ. बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला 2 जागा दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना काँग्रेस पॅनलसाठी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा संघटक असलम शेख, माजी शहरप्रमुख भरत मोरे व शिवसेनेचे आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

तीन उमेदवारांना बिनविरोधची संधी
आज (गुरुवारी) 3 मतदार संघामध्ये एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून अशोक नवले, अनु.जाती जमातीमधून रावसाहेब मोकळ तर भटके विमुक्त जाती-जमातीमधून रामदास केकाण यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीमध्ये अखेर झाली बिघाडी.!
कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला व काँग्रेसला राष्ट्रवादीने डावलल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेना व काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news