शिर्डी : पुण्यातील तरुणीवर शिर्डीत अतिप्रसंग | पुढारी

शिर्डी : पुण्यातील तरुणीवर शिर्डीत अतिप्रसंग

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : समाज माध्यमाद्वारे तिची शिर्डीच्या तरुणांशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले अन् त्यातून पुण्यातील ती तरुणी गरोदर राहिली. त्यानंतर तरुणाने लग्नास टाळाटाळ केल्याने पिडित तरुणीने तरुणाविरुद्ध अतिप्रसंग केल्याची फिर्याद पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात देत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पुणे पोलिसांनी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला. शिर्डी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली.

अर्जुन सीताराम पवार (वय 35, रा. विरभद्रपार्किंग, शिर्डी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. समाज माध्यमातून पुण्याची एक तरुणी व शिर्डीतील तरुण हे दोघे मित्र झाले. काही काळानंतर तो तरूणीला भेटण्यास पुण्यात गेला होता. नंतर ती त्याला भेटण्यास शिर्डीत आली होती. यानंतर ती वारंवार शिर्डीत भेटण्यास येत होती. यानंतर दोघांमध्ये जुलै 2021 ते जुन 2022 दरम्यान शिर्डीच्या विविध लॉजमध्ये शारीरिक संबंध आले. यातून तरुणी गरोदर राहिली. नंतर तरुणीने सातत्याने लग्नाची मागणी केली, मात्र तो टाळाटाळ करू लागल्याने अतिप्रसंग केल्याची फिर्याद पुण्यात फरासखाना पोलिसात दिली.

पुणे पोलिसांनी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी अर्जुन पवार यास ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे अधिक तपास करत आहेत.

Back to top button