सख्ख्या जावांचा सासरी छळ, अकोले पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा | पुढारी

सख्ख्या जावांचा सासरी छळ, अकोले पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

अकोले : पुढारी वृत्तसेवा : माजी नगरसेविकेसह तिच्या बहिणीला सासरी नांदत असताना मानसिक व शारीरिक त्रास देवून मारहाण करुन घरातून हाकलून दिल्याने पती, सासू, सासरे व दिर यांचेविरुद्ध कौटुंबिक हिसांचाराचा गुन्हा अकोले पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याबाबत अकोले पोलिसांत कीर्ती मनोज पाचोरे (अयोदया सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक) व काजल पंकज पाचोरे (खोडियार सोसायटी, कोनार्कनगर, आडगाव, नाशिक) या दोन सख्ख्या बहिणींचा दोन सख्ख्या भावांशी विवाह झाल्याने त्या जावा-जावाही आहेत.

त्यांनी दोन वेगवेगळ्या फिर्याद दिल्या असून कीर्ती यांचे फिर्यादीत म्हटले आहे की, किर्ती या सासरी नांदत असताना पती मनोज आबा पाचोरे, सासरे आबा रामा पाचोरे, सासु विजया आबा पाचोरे व दिर पंकज आबा पाचोरे यांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच माहेरुन 5 लाख रुपये आणावे म्हणूनही त्रास दिला. त्यांनी वडिलांकडून थोडे-थोडे करुन 5 लाख रुपये दिले. तरी त्रास देवून मारहाण करुन घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर काजल पंकज पाचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्या सासरी नांदत असताना पती पंकज आबा पाचोरे, सासरे आबा रामा पाचोरे, सासु विजया आबा पाचोरे, भाया मनोज आबा पाचोरे यांनी मानसिक, शारीरिक त्रास देवून छळ करुन, शिवीगाळ दमदाटी करुन घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि मिथुन घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॅा. आहेर करत आहे.

Back to top button