ऊस वाहतुकीचा जीवघेणा खेळ त्वरित थांबवा ; नाशिकच्या क्षेत्रिय परिवहन अधिकार्‍यांना निवेदन | पुढारी

ऊस वाहतुकीचा जीवघेणा खेळ त्वरित थांबवा ; नाशिकच्या क्षेत्रिय परिवहन अधिकार्‍यांना निवेदन

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  ऊस वाहतुकीसाठी साखर कारखानदारांनी डबल ट्रॅक्टर-ट्रॉलीचा जीवघेणा खेळ थांबवावा, अशी मागणी मोटार मालक कामगार संघटनेने केली आहे. नाशिकच्या क्षेत्रीय परिवहन अधिकार्‍यांकडे चर्चा करून या वाहतुकीवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसवाहतुकीसाठी साखर कारखानदारांनी सध्या मोठ्या प्रमाणात ट्रकऐवजी ट्रॅक्टर डबल ट्रॉलीचा दुरोपयोग केला जात आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टर हे शेत अवजार असून, त्याचा ऊस वाहतुकीसाठी चुकीच्या मार्गाने वापर केला जात आहे.

त्यामुळे अनेकदा निष्पाप लोकांचा अपघातातून जीव जात असून, परिवहन विभागाने डबल ट्रॉली ऊस वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी राज्य मोटर मालक कामगार वाहतुक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव व कोपरगांव अध्यक्ष आयुबभाई कच्छी यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच नाशिकच्या क्षेत्रीय परिवहन अधिकार्‍यांकडे एका निवेदनाव्दारे केली.

क्षेत्रीय परिवहन अधिकार्‍यांना दिलेल्या निवेनात म्हटले की, तालुक्यातील मुरमे गावात ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊस कारवर पडून विचित्र अपघात झाला. त्याचे सचित्र वृत्त क्षेत्रीय परिवहन अधिकार्‍यांसमोर ठेवून ही जीवघेणी वाहतूक बंद करण्याचे साकडे घातले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत डबल ट्रॅक्टर,जुगाड ओव्हरलोड,रिफ्लेक्टर, पासिंग दंड, ब्लॅकलिस्ट व विविध संघटनात्मक सभासदांच्या हिताच्या विषयावर चर्चा केल्याची माहिती अध्यक्ष आयूब कच्छी यांनी दिली.

ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचालक हा प्रशिक्षित व अनुभवी नसल्यामुळे अनेक अपघात होतात. ट्रॅक्टर चालक रस्ता पार करताना ट्रॅक्टरमध्ये विरुंगुळ्यासाठी गाणे मोठ्या वाजवत चोलतो. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. चढावर ऊस वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरचे समोरील चाक वर उचलले जाते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर पलटी होत असताना याकडे प्रादेशिक परिवहन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे हकनाक निष्पाप लोकांचे बळी जातात.

असे असतानाही या ट्रॅक्टर ऊस वाहतुकीवर कारवाई केली जात नसल्याचे यावेळी परिवहन विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे नाशिक अध्यक्ष सचिन जाधव, कोपरगांव अध्यक्ष आयूब कच्छी, विनायक वाघ, उल्हासशेठ दोषी, हिरामण महाजन, किरण वैद्य,जैन काका, नरेश बन्सल, बेनिवालजी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कारवाईचे धाडस दाखविणार?

डबल ट्रॉलीने ट्रॅक्टर ऊस वाहतूक राजरोस करीत असतानाही अनेकदा प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहने तपासण्यासाठी रस्त्यावरून जात असतांना हा जीवघेणा खेळ पाहत असतात. मात्र, या वाहतुकीवर कारवाई करण्याचे धाडस दाखवित नसल्यामुळे नियमांचे उल्लघनाचाच हा एक प्रकार असतांना त्यांना कोण

Back to top button