सोनई : बेकायदा दारू, जुगार अड्ड्यावर छापा | पुढारी

सोनई : बेकायदा दारू, जुगार अड्ड्यावर छापा

सोनई, पुढारी वृत्तसेवा: सोनई पोलिस ठाण्याअंतर्गत मोरेचिंचोरे, पानसवाडी, खोसपुरी, पानेगाव येथे बेकायदा दारू विक्री व जुगार अड्ड्यावर सोनई पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली.

सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरींनी मिळालेल्या माहितीवरून मोरेचिंचोरे येथील नदीच्या पुलाजवळील टपरीच्या आडोशाला गोरख अशोक माळी (वय 24), पानसवाडी शिवारातील एका हॉटेलच्या मागील पत्रा शेडजवळून बापू कोंडीराम गिर्‍हे (वय 48, रा. पानसवाडी), वांजोळी शिवारातून खोसपुरी फाट्याजवळ संतोष भाऊसाहेब कदम (रा. खोसपुरी), पानेगाव येथील हॉटेल परिवारच्या मागील पत्र्याच्या आडोशाजवळ चंद्रकांत हौशीराम जंगले (वय 50, रा. पानेगाव, ता.नेवासा) विनापरवाना बेकायदा दारू विक्री करत असल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे कारवाई केली.

पांढरीपूल वांजोळी शिवारातील खोसपुरी फाट्याजवळ श्याम सुमंत भालेराव (रा. खोसपुरी) हा विनापरवाना बेकायदेशीर पद्मावती मटका हारजीतीचा जुगार खेळताना मिळून आला; पण पोलिसांची चाहूल लागतात तो पळून गेल्याने कारवाई करण्यात आली.सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्ता गावडे, पोलिस नाईक सोमनाथ झांबरे, पोलिस नाईक विशाल थोरात तपास करत आहे.

Back to top button