पाथर्डीत वृद्धाकडून मुलीचा विनयभंग | पुढारी

पाथर्डीत वृद्धाकडून मुलीचा विनयभंग

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : बाजरी विकत आणायला गेलेल्या एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाथर्डी तालुक्यातील एका साठ वर्षीय इसमाविरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला अ‍ॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासमवेत राहते. तिचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पिडीत मुलीबरोबर अश्लील कृत्य करणारा 60 वर्षीय इसम संबंधित मुलगी राहत असलेल्या परिसरातच राहतो. घटनेच्या दिवशी ती मुलगी संबंधित इसमाच्या घरी बाजरी आणायला गेली होती.

ती घरात आल्यानंतर त्या इसमाने आपल्या घराचा दरवाजा लावला आणि मुलीशी अश्लिल वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करत त्या इसमाच्या हाताला झटका देवून सुटका करून घेतली. दरम्यान, हा प्रकार त्या मुलीने आपल्या घरी सांगितला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठून त्या 60 वर्षीय इसमाविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाथर्डी पोलिस पुढील तपास करीत आहे.

Back to top button