राजुरी : कत्तलीसाठी आणलेल्या गायी, वासरांची सुटका | पुढारी

राजुरी : कत्तलीसाठी आणलेल्या गायी, वासरांची सुटका

राजुरी; पुढारी वृत्तसेवा : कत्तलीकरीता आणलेल्या गोवंश जातीचे गाया व वासरांची सुटका करून लोणी पोलिसांनी 200 किलो गोमांसासह 5.68 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गोवंश जनावरांच्या कत्तलीबाबत माहिती घेताना (दि. 12) रोजी सपोनि समाधान पाटील लोणी पोलिस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ममदापूर येथे कुरेशी मोहल्ला येथे कैफ रउफ कुरेशी व जावीद नाजुक खाटीक हे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश मांस विक्रीच्या उद्देशाने जनावरांची कत्तल करीत आहेत.

सपोनि समाधान पाटील यांनी तत्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली दोन पंचांसह 8.10 छापा टाकला.
या छाप्यात गोवंश जातीचे मांस, 6 गोवंश गायी, 6 वासरे व महिंद्रा कंपनीच्या 2 पिक अप असा 5.68 लाखाचा मुद्दमाल जप्त केला. या गुन्ह्यात जब्बार हसन शेख (वय 45 वर्षे), कैफ रउफ कुरेशी (वय 22 वर्षे), जावीद नाजुक खाटीक (वय 33 वर्षे), कृष्णा एकनाथ गोरे(सर्व रा. ममदापूर, ता. राहाता) यांच्या विरुध्द लोणी पोलिसात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक संजय सातव, सपोनि समाधान पाटील, सुदाम फटांगरे, आसीर सय्यद, दिपक रोकडे, कैलास भिंगारदिवे यांनी केली.

Back to top button