श्रीरामपूर : दीपाली ससाणेंचा राहुल गांधींशी संवाद! | पुढारी

श्रीरामपूर : दीपाली ससाणेंचा राहुल गांधींशी संवाद!

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बहुचर्चित कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली असता, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपाली करण ससाणे या यात्रेत सहभागी झाल्या. दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.

या चर्चेत दिपाली ससाणे यांनी कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे, मुलींच्या विवाहासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

देशातील वाढती महागाई व बेरोजगारी या समस्यांबरोबरच कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने अशा विधवा महिलांना घर- प्रपंच चालवणे अवघड झाले आहे. दोन वर्षांनंतर कोरोना संपला असला तरी या महिलांच्या समस्या मात्र संपल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या विविध योजना या विधवा महिलांपर्यंत पोहोचल्या जातात की नाही, याबाबत संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली पाहिजे, असेही राहुल गांधीशी केलेल्या चर्चे दरम्यान दिपाली ससाणे यांनी मत मांडले.

आस्थेने केली चौकशी..!
चर्चेदरम्यान महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत असल्याचे दिपाली ससाणे यांनी सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली.

Back to top button