उसाचे वजन खासगी काट्यावर घेणार | पुढारी

उसाचे वजन खासगी काट्यावर घेणार

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शेतकरी संघटनाच्या अनेक तक्रारी व मागणीला यश आले असून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून उसाचे वजन खासगी काट्यावर केलेले वजन कारखान्यांना ग्राह्य धरणे बंधनकारक आहे. तशी परवानगी देण्यात आल्याचे 9 नोव्हेंबरच्या पत्राने संबंधिताना कळविले आहे. शेतकर्‍यांनी खासगी वजन काट्यावर वजन करून नेल्यास कारखान्याकडून तोडबंद, वाहन बंद आदी केल्यास कारखान्याचा गाळप परवाना बंद होणार आहे. मापात पाप व शेतकर्‍यांशी बेईमानी करणार्‍या कारखान्यांना यामुळे चाप बसणार आहे.

अनुसूचित प्रथेवाबत कार्यवाही न झाल्यास जिल्ह्याचे उपनियंत्रक वैधमापन शास्त्र यांचेकडे तक्रार दाखल करता येणार आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) हे सुनावणी घेऊन निर्णय देतील याप्रमाणे पारदर्शक सुविधा मिळेल. अशी माहिती शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली अ‍ॅड. अजित काळे व सहकारी सतत पाठपुरावे करीत आहेत.

Back to top button