महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला घ्यावी : आ. संग्राम जगताप | पुढारी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला घ्यावी : आ. संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहराला द्यावी. आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू नगर शहराला कुस्तीचा वारसा आहे. तो जोपासण्यासाठी काम करायचे आहे. सध्या जिमचे फॅड आले आहे. त्यामुळे पैलवान कोल्हापूरला जायचे बंद झाले आहेत. युवकांना कुस्ती क्षेत्राकडे वळविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुस्तीगीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष, आमदार संग्राम जगताप यांनी केले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र केसरी स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी वाडिया पार्क मैदानाची पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, सचिव अमृता भोसले, दयानंद भट्ट, सुभाष ढोले, चंद्रकांत शिंदे, युवराज घोरपडे, विजय कुरणे, पै. संतोष भुजबळ, पै. शिवाजी चव्हाण, पै. प्रवीण घुले, पै. शिवाजी कराळे, पै. गुलाबराव बर्डे, पै. काशीद, पै. अनिल गुंजाळ, विठ्ठल लांडगे, पै. युवराज करंजुले, पै. शंकर खोसे, पै. उमेश भागानगरे, पै. अफजल शेख,पै. अतुल कावळे, पै.दादा पांडुळे, पै. मोहन गुंजाळ, पै. प्रमोद गोडसे, पै. संदीप कावरे, पै. मधुकर उचाळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजनासाठी अहमदनगर जिल्हा सह तीन जिल्ह्यांनी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील मैदानाची पाहणी केली आहे. चारही जिल्ह्यांची पाहणी झाल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद निर्णय घेणार आहे. आज मी सांगू शकत नाही. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे. ही स्पर्धा नगरला व्हावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे.

Back to top button