संगमनेर : बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

संगमनेर : बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातून जाणार्‍या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील नवजीवन बेकरीजवळ भरधाव वेगाने आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने समोरून दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत आनंदवाडी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. अशोक राघू काळे (वय 37,रा.आनंद वाडी, चंदनापुरी, ता.संगमनेर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

या बाबत संगमनेर शहर पोलिसां कडून समजलेली अधिक माहिती अशी की जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील नवजीवन बेकरीजवळ एमएच.14, बीटी 4589) ही मिरज नाशिक बस पुणेच्या दिशेकडून संगमनेरच्यादिशेनेजुन्यामार्गाने नवजीवन बेकरीजवळ बसने दुचाकीला (एमएच.17, एक्यू.8448) ला समोरुन जोराची धडक दिली. दिली असता झाले ल्या भीषणअपघातात दुचाकीस्वार काळे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचा भाऊ सुभाष काळे यांनी संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. अमित महाजन हे करत आहे

Back to top button