नगर : शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेस अडीच लाखांचा गंडा | पुढारी

नगर : शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेस अडीच लाखांचा गंडा

नगर; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून, नोकरदार महिलेची 2 लाख 52 हजार 385 रूपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या सावेडी उपनगरातील महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज मोढवे (रा. वाकोडी ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सावेडी उपनगरातील महिला नागापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असून, त्याच कंपनीत नोकरीला असणार्‍या मोढवे बरोबर त्यांची ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर महिलेने त्यांच्या झोपडी कॅन्टीन येथील टीजीएसबी सहकारी बँक खात्यातून ऑनलाईन मोढवे याच्या नंबरवर 52 हजार 385 रुपये पाठविले. तसेच, दोन लाख रुपये रोख दिले होते. मोढवे याने फिर्यादी यांच्या नावे शेअर मार्केटमध्ये कुठलीही गुंतवणूक न करता त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे दिलेले पैसे परत न केल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत मोढवे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

 

 

Back to top button