संगमनेरात पोलिसांकडून 900 किलो गोमांस जप्त | पुढारी

संगमनेरात पोलिसांकडून 900 किलो गोमांस जप्त

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील खाटीक गल्ली परिसरामध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तल खान्यावर अ. नगर जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस पथकाने (एलसीबी) छापा टाकून 1 लाख 80 हजार रुपयांचे 900 किलो गोंमास जप्त केले. या प्रकरणी शहर पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शहर पोलिसांकडून सांगितले की, शहरात खाटीक गल्ली परिसरात बेकायदेशीर कत्तलखान्यावर अ. नगर जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे स.पो. नि. दिनकर मुंडे यांच्या पथकाने छापा टाकून कत्तलखान्यात कत्तल करून ठेवलेल्या गोवंश जनावरांचे 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 900 किलो गोमांस, सुरे व कुर्‍हाड पोलिसांनी जप्त केली. पो. ना. सचिन दत्तात्रय आडबल यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. सगीर बुढान कुरेशी, (वय 40 रा. खाटीक गल्ली, संगमनेर), मुशफिक मजरुल शेख, (वय 50, रा. भारतनगर), मतीन बशीर कुरेशी (वय 35), फयीम खालीद कुरेशी (वय 35, दोघे रा. मोगलपुरा), इर्शाद कादर कुरेशी, मुजाहीद अब्दुल करीम कुरेशी (दोघे रा. खाटीक गल्ली) या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, मात्र ते पसार झाले.

 

Back to top button