शेवगाव : ‘त्या’ 5 शेतकर्‍यांना ‘ज्ञानेश्वर’कडून दिलासा | पुढारी

शेवगाव : ‘त्या’ 5 शेतकर्‍यांना ‘ज्ञानेश्वर’कडून दिलासा

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : जळालेला ऊस गाळपास गेल्याने शेतकर्‍यांचे पुढील नुकसान टळले आहे. ज्ञानेश्वर कारखान्याने याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना गाळपाचा आधार दिल्यामुळे सदर शेतकरी काहिसे सावरले आहेत . तीन-चार दिवसांपूर्वी खरडगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच शेतकर्‍यांचा दहा एकर ऊस जळून खाक झाला. उसाला आग लागली, हे समजतात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन प्रशासनाने तत्पुरता दाखवून तेथील शेतकर्‍यांच्या जळालेल्या उसाची गाळपासाठी तातडीने तोडणी सुरू केली.

यामुळे त्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना काहीसा आधार मिळाला आहे. अतिवृष्टी तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती असेल वा शेतकरी कुठल्याही संकटात असेल, तर ज्ञानेश्वर कारखाना शेतकरी हीत लक्षात घेऊन नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा असतो. त्याचाच प्रत्यय या घटनेतून सर्वसामान्य शेतकर्‍यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे.

दरम्यान, वीजवाहक ताराचे शॉटसर्किट झाल्याने शेताला पूर्ण आग लागली. त्यात जोराचा वारा असल्यामुळे आमच्या परिसरातील पाच शेतकर्‍यांचा आठ ते दहा एकर उस जळून खाक झाला. त्यांच्यानतर ज्ञानेश्वर कारखान्याच्या व्यवस्थापकाशी संपर्क केला. त्यांनी तातडीने दुसर्‍या दिवशी ऊस तोड दिली. आता जवळपास साठ टक्के ऊस तुटून गेला. ज्ञानेश्वर कारखान्याने शेतकर्‍यांबाबत तत्परता दाखवल्याने आमचे होणारे पुढील नुकसान टळल्याची प्रतिक्रिया कल्याण काकडे व मल्हारी लवांडे या शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

सन 2021-22 मध्ये 25 ऑक्टोबर 2021 ते 15 मे 2022 दरम्यान एकूण 126.91 हेक्टर क्षेत्रातील शॉर्टसर्किट वा अन्य कारणांनी जळालेल्या उसाचे व 350 हेक्टर पूरबाधित उसाचे गाळप करून अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना ज्ञानेश्वर कारखान्याने दिलासा दिलेला आहे.

                                                     – अनिल शेवाळे, कार्यकारी संचालक

Back to top button