राजापुरात बिबट्याने केल्या 4 शेळ्या फस्त | पुढारी

राजापुरात बिबट्याने केल्या 4 शेळ्या फस्त

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  भक्षाच्या शोधात फिरणार्‍या बिबट्याने धुमाकूळ घालत 2 शेळ्या व 2 बोकड फस्त केले. ही घटना तालुक्यातील राजापूर येथे घडली. गावातील भाऊसाहेब मार्तंड खतोडे यांच्या सर्वे नंबर 62 मधील घराजवळ गोठ्यात रात्री बिबट्याने धुमाकूळ घालत 2 शेळ्या व 2 बोकड फस्त केले. वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल एस. बी. ढवळे, वनरक्षक श्रीमती जे. ए. पवळे, वॉचमन गोरडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

राजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे आढळत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी भयभीत झाले. या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी संगमनेर साखर कारखाना व्हा. चेअरमन संतोष हासे, सरपंच शैला हासे, उपसरपंच बादशहा हासे, पो. पा. गोकुळ खतोडे, भारत शेलकर, भानुदास सोनवणे, बाळासाहेब शिरोळे, पंढरीनाथ हासे, भाऊसाहेब हासे, रावसाहेब खतोडे, शांताराम खतोडे, रामनाथ खतोडे, सुदाम हसे, संदीप हसे, कैलास खतोडे, सत्यम खतोडे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button