

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लूज कांद्याला 3 हयार 381 रुपये प्रतिक्विंटल कमाल भाव मिळाला. एकूण आवक 4 हजार 660 क्विंटल एवढी झाली आहे. सर्वसाधारण भाव 2700 रुपये तर किमान भाव पाचशे रुपये मिळाला आहे. 218 वाहनातून हा कांदा आणण्यात आला होता.
शिरसगाव तिळवणी उपबाजार समितीमध्ये चार हजार तीनशे साठ क्विंटल कांद्याची आवक झाली, कमाल भाव तीन हजार पन्नास, सर्वसाधारण भाव 2630 तर किमान भाव 525 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मुख्य बाजार समिती कोपरगाव येथे 42 क्विंटल गव्हाची आवक होऊन कमाल भाव 2656, सर्वसाधारण भाव 2571, तर किमान भाव 2350 रुपये प्रति क्विंटल मिळाला. सोयाबीनची 1060 आवक होऊन कमाल बाजारभाव 5376 व सरासरी 5212 रूपये भाव मिळाला. मका 125 क्विंटल आवक होऊन कमाल बाजारभाव 2052 व सरासरी 2022 रुपये भाव मिळाला.