घोडेगावात कांद्याला साडेतीन हजार रुपये दर | पुढारी

 घोडेगावात कांद्याला साडेतीन हजार रुपये दर

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवार घोडेगाव येथे शनिवारी 44 हजार 432 कांदा गोण्यांची (239 ट्रक ) आवक झाली होती. लिलावामध्ये नंबर एक कांद्यास 3 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे. दिवाळीमुळे एक आठवडा बाजार समिती बंद होती. शनिवारी मार्केट सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी 239 ट्रक कांदा विक्रीसाठी आला. महाराष्ट्र व शेजारील राज्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यामुळे उन्हाळी कांदा भाव खाऊन जात आहे. दिवाळीनंतर मार्केट सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी भाववाढ झाल्याने शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला. कांद्याची टिकवण क्षमता संपत चालली आहे.ज्या शेतकर्‍यांकडे कांदा शिल्लक आहे. त्यांनी टप्याटप्प्याने कांदा विक्री सुरू करावी, असे कांदा व्यापारी शरदराव सोनवणे यांनी सांगितले.

कांद्याला मिळालेला बाजारभाव
एक दोन लॉट नंबर 1
कांदा : 3200 ते
3500
मोठा माल : 2500
ते 3000
गोल्टा : 2300
ते 2700
गोल्टी : 2200
ते 2600
जोड कांदा : 700
ते 1000
हलका डॅमेज कांदा :
300 ते 900 रुपये

Back to top button