संगमनेर : थोरात कारखाना ऊसतोड मजुरांचा व्हिडिओ चुकीचा | पुढारी

संगमनेर : थोरात कारखाना ऊसतोड मजुरांचा व्हिडिओ चुकीचा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी थोरात कारखान्याच्या नावाने दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या ऊस तोड मजुरांचा व्हिडिओ खोडसाळपणे पसरविल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली. या व्हिडिओबाबत माहिती देताना ओहोळ म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षांपूर्वी ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला होता. त्यात काही मजूर मृत्युमुखी पडले होते.

हा व्हिडिओ टीव्हीसह काही समाज माध्यमांवर त्यावेळी प्रसिद्ध झाला होता, परंतु कोणीतरी खोडसाळपणे पुन्हा दोन दिवसांपूर्वी तो व्हिडिओ थोरात कारखान्याचे मजूर ट्रॅक्टरमधून जखमी झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केला, हे चुकीचे आहे. ही दुर्घटना उत्तर प्रदेशात दोन वर्षांपूर्वी घडली, तिचा थोरात कारखान्याशी संबंध नाही. कारखान्याच्या मजुराबाबत असा प्रकार झाला नाही, नागरिकांनी यावर विश्वास ठेऊ नये. या व्हिडिओबाबत अनेकांचे फोन आले, परंतु असे काही झाले नसल्याने गैरसमज पसरवू नये, असे उपाध्यक्ष संतोष हासे व कार्य. संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले.

Back to top button