दिघोळ येथे अंगावर वीज पडल्याने जखमी, विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस | पुढारी

दिघोळ येथे अंगावर वीज पडल्याने जखमी, विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस

जामखेड पुढारी वृतसेवा :  तालुक्यातील दिघोळ येथे विकास राजेंद्र आटकरे आईवडीला बरोबर शेतात काम करत असताना जोरदार पाउस सुरु झाला पाऊसासोबत विजांचा कडकडाट सुरु झाला, धोधो पाउस सुरु झाल्याने निवारा शोधत विकास हा चिंचेच्या झाडाखाली थांबला आणि तेवढ्यात वीज कोसळली पण दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला पण पाठीला व पायाला जखम झाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली तसेच आज दिघोळ परिसरात विजांच्या कडकडाट सह जोरदार पाऊस झाला.

आठवडाभरापासून जामखेड तालुक्यातील परतीचा पाऊस जोरदार सुरु आहे त्यातच आज २० अॅक्टोबर रोजी दुपारी दिघोळ परिसरात विजांच्या कडकडाट दोन तास जोरदार पाऊस पडला. याच वेळी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दिघोळ येथील खर्डा रोडवरील एका टेकडीवर विकास राजेंद्र आटकरे (वय १८ रा. दिघोळ) हा आपल्या आई वडील व चुलत भावा सोबत शेतातील कामाला मदत करत होता. या वेळी दिघोळ परिसरात विजांच्या कडकडाट सह जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे विकास आटकरे हा शेतातील एका चिंचेच्या झाडाखाली जाऊन थांबला होता. मात्र अचानक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली त्यामुळे तो या घटनेत त्याच्या पाठीला व पायावर जखम झाली तसेच त्याच्याजवळील मोबाईल देखील वीज कोसळल्याने जळाला आहे.

घटनेची माहिती समजताच गावातील युवकांनी धाव घेत जखमी विकास यास एका वाहनाने जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. विकास आटकरे हा इयत्ता अकरावी मध्ये शिकत आहे. या नंतर तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कुंडलिक आवचरे यांनी उपचार केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Back to top button