वासुंदे-खडकवाडी रस्त्यासाठी 7 कोटी ; आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते 15 ऑक्टोबरला शुभारंभ | पुढारी

वासुंदे-खडकवाडी रस्त्यासाठी 7 कोटी ; आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते 15 ऑक्टोबरला शुभारंभ

टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर व संगमनेर तालुक्यांना जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वासुंदे ते खडकवाडी या 7 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. 15 ऑक्टोबर रोजी कामाचा प्रारंभ वासुंदे येथे होणार असल्याची माहिती गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ.झावरे व माजी सरपंच महादू भालेकर व रवींद्र झावरे यांनी दिलीे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने खडकवाडी, मांडवे, पळशी, वासुंदे, माळवाडी, देसवडे, बोकनकवाडी, लाखेवाडी, शिक्री, कामटवाडी, टेकडवाडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील लोकांनी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वेळोवेळी आमदार लंके यांच्याकडे केली होती.

त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी 7 कोटी रुपये निधी रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरणसाठी मंजूर करण्यात आला आहे. खडकवाडी-वासुंदे परिसरातील 10 ते 15 गावांसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी ऊसउत्पादक, कांदा उत्पादक व शाळकरी मुलांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता अरुंद असल्याने अपघात वाढत चालले होते. परंतु आता या रस्त्याच्या मजबुतीकरण व रूंदीकरणासाठी मोठा निधी मिळाल्याने रस्ता चांगला होणार असल्याचे अमोल उगले, रवींद्र झावरे, सुदामराव शिर्के, संचालक रावसाहेब बर्वे यांनी दिली.

प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार : लंके
पारनेर तालुक्यातील अनेक स्वयंघोषित नेते गावागावांत व चौकाचौकांत नारळ फोडण्यात व फलक लावण्यात पटाईत आहे. आम्ही मात्र या वासुंदे ते खडकवाडी रस्त्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, गेल्या 4 महिन्यापासून हे काम प्रगतीपथावर आहे. आहे. त्यामुळे इतरांसारखी नुसते नारळ न फोडता किंवा फलक न लावता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून मगच उद्घाटन करत असतो, असा टोला आमदार तंके यांनी विरोधकांना लगावला.

रस्ताकामामुळे दुर्गम भागाला न्याय
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खडकवाडी ते वासुंदे रस्त्यासाठी आमदार लंके यांनी निधी दिला आहे. यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था दूर होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या सात किलोमीटरच्या रस्त्यासाठी एवढा निधी उपलब्ध करून दुर्गम भागाला खर्‍या अर्थाने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया गुरुदत्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व ग्रामपंचायत सदस्य पोपटराव साळुंके व ज्येष्ठ नेते भागूजी दादा झावरे यांनी व्यक्त केली.

Back to top button