नगर: लष्कराशी संबंधित आणखी एकास अटक, बनावट एनओसी; आरोपी लष्करातील निवृत्त कर्मचारी | पुढारी

नगर: लष्कराशी संबंधित आणखी एकास अटक, बनावट एनओसी; आरोपी लष्करातील निवृत्त कर्मचारी

नगर, पुढारी वृत्तसेवा: बनावट एनओसी प्रकरणात आणखी एका आरोपीला (दि.11) पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तो लष्करात बांधकाम परवानगीसाठी लागणार्‍या एनओसी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सूरू होती.

विनय दत्तात्रय वर्‍हाडे (वय 65, रा. भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला आरोपी राजेंद्र उर्फ राजा ठाकूर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दुसरा आरोपी रोहन धेंडवाल याला अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन बनावट शिक्के, प्रिंटर जप्त केले असून लॅपटॉपचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मंगळवारी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो लष्करातच एनओसी विभागात आवक जावक विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून पोलिस कोठडीसाठी त्याला न्यायालयात बुधवारी हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे करत आहेत.

Back to top button