राहुरी : व्याजाच्या रकमेसाठी एकाचे अपहरण | पुढारी

राहुरी : व्याजाच्या रकमेसाठी एकाचे अपहरण

 पुढारी वृत्तसेवा : व्याजाची 60 हजारांची रक्कम वसूल करण्यासाठी अमोल पाटील यांचे तिन आरोपींनी अपहरण करून नेले. तसेच त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द शिवारात घडली.  अमोल सुनिल पाटील (वय 42, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) यांनी आरोपीकडून 30 हजार रुपये रक्कम घेतली होती. या रक्कमेवर आरोपी दरमहा 20 हजार रूपये व्याज घेत होत होते. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी अमोल सुनिल पाटील हे त्यांच्या मोटरसायकलवर कोल्हार खुर्द ते पाटीलवाडी रोडने जात असताना आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडविली.

गाडीची चावी काढून घेतली. त्यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी विशाल लवांडे याने पिस्तूल काढून अमोल पाटील यांना दाखवत ‘आज तूला गोळ्या घालून मारूनच टाकतो, अशी धमकी दिली. नंतर अमोल पाटील यांना त्यांच्या गाडीवर बळजबरीने बसवून चिंचविहिरे गावचे शिवारातील पडीक शेतात नेले. तेथे मारहाण करून ‘तूला जिवंत घरी जायचे असेल, तर आत्ताच तुझ्या घरच्यांना फोनवरुन 60 हजार रूपये मागून घे’ सदर घटनेची माहिती अमोल पाटील यांनी त्यांच्या भावाला सांगितली.
तूम्ही मला मारहाण करू नका. मला सोडून द्या. माझा भाऊ पैसे घेऊन येत आहे. तेव्हा आरोपी म्हणाले ‘तुझा भाऊ पैसे घेऊन नाही आला तर तूला मारून टाकू’. अशी धमकी दिली.

तेव्हा अमोल पाटील यांनी अंधाराचा फायदा घेऊन कशीबशी आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत राहुरी पोलिस ठाणे गाठले. अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल लवांडे, (रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहता) तसेच इतर दोन अनोळखी इसम अशा तिघा जणांवर अपहरण, मारहाण व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव शिंदे हे करीत आहेत.
या परिसरात काही खासगी सावकारांनी शेतकर्‍यांसाह गोर-गरीब जनतेचा अमानुष खेळ केल्याची घटना घडलेल्या आहेत. कुठलीची अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी या सावकारांचा बंदोबस्त करावा.

Back to top button