ना. विखे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

ना. विखे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून न्याय मिळण्यासाठी सुरू असलेला लढ्याला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे बळकटी मिळाली आहे. ना. विखे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंत्रालयात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ना. सत्तार यांनी प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय देऊ, असे आश्वासन दिले. म. फुले कृषी विद्यापीठातील प्रकल्प्रगस्तांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. 584 शेतकर्‍यांपैकी मागील 54 वर्षांच्या कालखंडामध्ये केवळ 362 शेतकर्‍यांना न्याय मिळाला.

उर्वरित शेतकर्‍यांनी म. फुले कृषी विद्यापीठ निर्मितीला स्वतःची जमीन देत कोणती चूक केली, असा प्रश्न विचारत शेतकर्‍यांच्या मुलांनी गेल्या दोन वर्षांपासून शासनाविरोधात लढा सुरू ठेवला होता. अखेर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत युवा नेते भैयासाहेब शेळके यांच्यासह विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे व धीरज पानसंबळ यांनी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पा. यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यानुसार ना. विखे यांनी मंत्रालयामध्ये कृषीमंत्री सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेत प्रकल्पग्रस्तांव्या समस्या जाणून घेतल्या.

ना. विखे पा. व ना. अब्दुल सत्तार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निवारण करण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले, राज्य कृषी परिषद संचालक डॉ. कदम, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य दत्ता पानसरे, उपसचिव बाळासाहेब रासकर, अवर सचिव उमेश चांदवडे, विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांना सूचना देत प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी विविध सूचना केल्या.

यांसह विकास मंडळाचे अध्यक्ष तनपुरे, प्रफुल्ल शेळके, पानसंबळ यांच्या पुढाकारातून प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेडगे, सचिन सम्राट लांडगे, अक्षय काळे, सुरेश पवार आदींनी भावना मांडल्या. विविध विभागाच्या प्रतिनिधींशी चर्चा साधत प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकार्‍यांना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या. ही बैठक महसूलमंत्री विखे यांच्या मार्गदर्शनातून झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त तरूणांनी आभार मानले.

नक्कीच यश मिळेल..!
विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी महसूलमंत्री विखे पा. व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. भैयासाहेब शेळके यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी ना. विखे पा. यांच्या माध्यमातून नक्कीच यश मिळेल, असे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news