विकासकामे गुणवत्तेसह त्वरित पूर्ण करा: आ. आशुतोष काळेंनी दिल्या प्रशासन, ठेकेदारांंना सूचना | पुढारी

विकासकामे गुणवत्तेसह त्वरित पूर्ण करा: आ. आशुतोष काळेंनी दिल्या प्रशासन, ठेकेदारांंना सूचना

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा: कोपरगाव शहर विकासासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून शहरातील 2 कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत, असे सांगत उर्वरित विकासकामे गुणवत्तेसह तातडीने पूर्ण करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांना दिल्या.

कोपरगाव शहरातील विकासकामांची पाहणी करून त्यांनी नगर परिषद अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.  आ. काळे म्हणाले, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कोपरगाव प्रशासकीय इमारतीस 2 कोटींचा निधी दिला. प्रशासकीय इमारतीसमोर बगीचा सुशोभीकरणास 1 कोटी रुपये, संरक्षक भिंतीसाठी 50 लाखाचा निधी दिला. धारणगाव रस्त्यासाठी 2 कोटी, बाजारतळ स्मशानभूमी व मोहिनीराज नगर येथे स्मशानभूमीसाठी 50 लाखांचा निधी मिळवून दिला आहे.

दरम्यान, या कामांचा आढावा त्यांनी घेतला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सामाजिक सभागृहांच्या निधीतून सुरू कामांचा आढावा आ. काळे यांनी यावेळी घेतला असता, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी माहिती दिली. यावेळी धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, विरेन बोरावके, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँक संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कार्तिक सरदार आदी उपस्थित होते.

कामात अडचण नाही
पावसाचे प्रमाण कमी झाले. येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णतः थांबणार आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये अडचणी यापुढे येणार नाहीत. विकास कामे गुणवत्तेसह तत्काळ पूर्ण करा,अशा सूचना आमदार काळे यांनी केल्या.

 

Back to top button