

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा: शारदिय नवरात्र उत्सवात गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघातील महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवणे, त्यांना सुखरुप घरापर्यंत परत पोचवणे, हे राजकारण नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून, मी जबाबदारी पार पाडत आहे. या सर्व नियोजनात पारनेर आणि नगर तालुक्यातील गावांतील सर्व कार्यकत्यांच्या नियोजनानाचे फळ असल्याने, कार्यकर्ता हीच माझी ताकद,' असल्याचे मत आमदार नीलेश लंके यांनी आज चांदबिबी महाल परिसरात केले.
समारोपासाठी रष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख उपस्थित होते. लंके म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून आठव्यामाळेपर्यंत एक लाख 26 हजार महिलांनी मोहटादेवी दर्शन घडवण्याची ताकद, तुम्हा माता भगिंनीच्या आशीर्वादाने मिळाली. मी तुमचा मुलगा म्हणून ही सेवा करत,' असल्याचे त्यांनी सांगितले. महेबुब शेख म्हणाले, आजच्या राज्यातील सरकार राजकारण म्हणून उपयोग करतात, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामाजिक कर्तव्य म्हणून, ही जबाबदारी पर पाडत आहेत.
आमदार नीलेश लंके अधूनिक युगातले श्रावणबाळ असून, ते प्रत्येक माता भगिनींची आपल्या माता-पित्या प्रमाणे सेवा करतात. त्यांना नगर आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ता मनापासून सहकार्य, काोटेकोर नियोजनाने हा देवी दर्शनाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या नियोजनासाठी सरपंच प्रियंका लामखडे, अजय लामखडे, अनुराधा कांडेकर, शिवा हेळकर, संजय जपकर, वसंत पवार, घनश्याम म्हस्के, नितीन कोतकर, हरिदास जाधव, बाबा काळे,सुनीता धनवटे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
तिनशे बसची व्यवस्था
पहिल्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत महिलांना दर्शनासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे तीनशे बसेसची व्यवस्था केली. हभागी सर्व माता – भगिनींना पराळाची व्यवस्था केली. याचे नियोजन आमदार लंके प्रतिष्ठानचे सर्व कायकर्ते करत आहेत.