नगर : गुन्हा मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी, महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा | पुढारी

नगर : गुन्हा मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी, महिलेला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

नगर; पुढारी वृत्तसेवा: दाखल केलेला गुन्हा मागे घे नाहीतर आठ दिवसात तुझा मर्डर करतो, अशी धमकी देत महिलेला चापटीने मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.3) सैनिक लॉनजवळ घडली. याबाबत कमल वसंत जाधव (वय 45, रा. गणेशनगर, भिंगार नगर-पाथर्डी रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमल जाधव यांच्या फिर्यादीवरून शिशिर बाळकृष्ण पाटसकर (रा.भिंगार, नगर) याच्याविरूद्ध नेवासा पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा खटला नेवासा कोर्टात सुरू आहे.

दरम्यान, कमल जाधव या सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास शेजारी राहणार्‍या सुनिता सुधाकर नागरे यांच्या मुलीला कपडे घेण्यासाठी कापडबाजारात होत्या. त्यावेळी सैनिक लॉनजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडविली. तू पाटसकर याच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुझा मर्डर करू, अशी धमकी दिली. त्यानंतर तुम्ही त्याचे कोण आहात अशी विचारणा केली असता मोटारसायकलवरील एकाने जाधव यांच्या तोंडावर चापट मारली व शिवीगाळ केली. पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे

Back to top button