वाळकी : अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोघे जेरबंद | पुढारी

वाळकी : अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोघे जेरबंद

वाळकी, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दोघांना नगर तालुका पोलिसांनी पकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त केल्या. एका 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वडिलांनी दिल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप करत असताना हा गुन्हा सुहास घन:श्याम बोठे (रा.वाळकी) याने केल्याची माहिती मिळाली. मुलीला पळवून नेण्यासाठी सुहास बोठे यास त्याचा भाऊ नवल घन:श्याम बोठे (वाळकी) व सचिन भास्कर जाधव (निमगाव वाघा, ता.नगर) यांनी मदत केल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी नवल बोठे व सचिन जाधव यांना पकडले. आरोपींनी मुलीला वाळकी येथून स्कोडातून (क्र.एम.एच.14, बी.के.4656) नगर-कल्याण रस्त्यावरील जखणगावपर्यंत नेले. तेथून वेरणा गाडी (क्र.एम.एच.11,वाय.9342)बोलावून तिच्यात बसविले.

Back to top button