साकूरमधून अल्पवयीन मुलीचे केले अपहरण | पुढारी

साकूरमधून अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  साकूर परिसरातील एक कुटुंबातील सतरा वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला पुन्हा घरी सोडले. मुलीचे कुटुंब आणि या तरुणाच्या कुटुंबात समझोता झाला.

परंतु, शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास वस्तीवर सदर अल्पवयीन मुलीसह तिची आई आजोबा, आजी घरी असताना अज्ञात नंबरच्या असलेल्या पांढर्‍या रंगाची ब्रिझा कारमधून अमोल बापू खेमनर, सिंधूबाई बापू खेमनर, बापू रंभा खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे (सर्व रा. साकूर ता. संगमनेर) व पोपट शेरमाळे (रा.समनापूर ता. संगमनेर) असे सहा जण वस्तीवर आले. त्यांनी मुलीच्या आई, आजोबांना म्हणाले की, तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे. या दोघांनी त्यांना समजावून सांगितले. त्यांनी आई, आजोबा, आजी यांना शिवीगाळ करत मारहाण करीत मुलीचे अपहरण केले.

Back to top button