करपरावाडीला पडला पुराच्या पाण्याचा वेढा | पुढारी

करपरावाडीला पडला पुराच्या पाण्याचा वेढा

कोंढवड : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे करपरावाडीला पाण्याने चोहोबाजुंनी वेढले आहे.  शिलेगाव, उंबरे व कपरवाडीचा रहदारीचा पुल तुटल्याने करपरावाडीचा संपर्क तुटल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, येथील सर्व पिके पाण्यात बुडाली आहेत. करपरा नदीचे चहुबाजुंनी बेट तयार झाले आहे. गेल्या 8 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने येण्या- जाण्याचा संपर्क तुटला आहे.

पावसामुळे शिलेगाव, करपरावाडी येथे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीनसह घासाचे मोठे नुकसान झाले. दुधाला भाव असल्याने पशुधनाचे भाव गगनाला भिडले. अशातच लंपी आजाराची साथ असल्याने शेतकरी अक्षरशः बेजार झाला आहे. बाधीत पिकांचे पंचनामे करून, शासनाने शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी विजय माळवदे, रमेश म्हसे, भगवान म्हसे, सुरेश भिमराज म्हसे, सोना मदने, शहाजी मोरे, अमोल म्हसे, गणेश उंडे, अनंत म्हसे, महेश म्हसे प्रदीप जगधने, गणेश म्हसे, प्रशांत म्हसे, अमोल म्हसे आदींनी केली आहे.

Back to top button