पारनेर : कॉलेजच्या छताचे प्लास्टर कोसळले, काही वर्षांपूर्वीच बिल्डिंगचे बांधकाम | पुढारी

पारनेर : कॉलेजच्या छताचे प्लास्टर कोसळले, काही वर्षांपूर्वीच बिल्डिंगचे बांधकाम

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स सायन्स कॉलेजमधील एका वर्गात प्राध्यापकांचा तास सुरू असताना वर्गातील छताचे प्लास्टर अचानक खाली पडले; मात्र त्याखाली विद्यार्थी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. अचानक पडलेल्या प्लास्टरमुळे वर्गातील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचार्‍यामध्ये एकच खळबळ उडाली. टीवाय बीएससी कॉम्प्यूटर सायन्स वर्गात तास सुरू असताना ही घटना घडली. काही वर्षांपूर्वीची बिल्डिंगचे बांधकाम झाले होते.

स्लॅबला केलेल्या प्लास्टरचा मोठा थर खाली कोसळला, त्यावेळी वर्गात विद्यार्थी होते. जेथे प्लास्टर कोसळले त्याखाली असणारी बेंच वाकला आहे; मात्र त्या बेंचवर विद्यार्थी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जातेय. संबंधित बांधकाम व प्लास्टरचा दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही इमारत अलीकडील दोन-तीन वर्षांपूर्वी बांधली असल्याचे समजते, अशा नवीन इमारतीचे छत कोसळत असेल, तर त्याची प्राचार्य, कॉलेजच्या समितीमार्फत दखल घेतली जावी. संपूर्ण बांधकामाची संबंधित यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

Back to top button