श्रीगोंदा : ‘जजमेंट फेल..! ..तर येरवडा जेल’ कोठडीतील 11 आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी | पुढारी

श्रीगोंदा : ‘जजमेंट फेल..! ..तर येरवडा जेल’ कोठडीतील 11 आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना वेठिस धरण्यासाठी श्रीगोंदा कारागृहातील आरोपींनी अन्यत्याग करतानाच भांडी वाजविण्याचा केलेला उद्योग त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. कोठडीतील 11 आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ‘जजमेंट फेल.. तर येरवडा’ जेल, या गुन्हेगारी जगतातील म्हणीचा प्रत्यय या प्रकरणात पहायला मिळाला. श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या जवळ ब्रिटिशकालीन दुय्यम कारागृह आहे.

संघटित गुन्हेगारीप्रकरणी कारागृहातील आरोपींनी 2 दिवसांपासून प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी गोंधळ घालत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. ते थांबले असले, तरी जेवणाची भांडी जोरजोरात वाजवणे बुधवारीही (दि. 21) सुरूच होते. पोलिस स्टेशन परिसरात आरडा-ओरड व भांड्यांच्या आवाजाने गोंधळ उडाला होता. तहसीलदार मिलिंद कुलथे, नायब तहसीलदार नीलेश वाघमारे, जेलर सचिन जाधव यांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आरोपींनी इतरांना वेठीस धरत गोंधळ सुरूच ठेवला. अखेरीस जिल्हा न्यायालयाने त्यांची रवानगी येरवड्याला केली आहे.

Back to top button