नगरच्या पालकमंत्री पदावरून सुंदोपसुंदी | पुढारी

नगरच्या पालकमंत्री पदावरून सुंदोपसुंदी

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. पालकमंत्रिपदासाठी मंत्री विखे पाटील इच्छुक असताना भाजप शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे घातले होते. तर, आज शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार सदाशिव लोखंडे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्रिपदासाठी गळ घातली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येताच भाजपच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नगर जिल्ह्याचे पालकत्त्व स्वीकारण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तसे 15 ऑगस्टला त्यांना पोलिस कवायात मैदानावरील ध्वजारोहण करण्याचा मान दिला होता. मात्र, अद्याप राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यात आज शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळाव्यात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या भाषणामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरचे पालकत्व घ्यावे, अशी गळ घातली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Back to top button