श्रीरामपूर : अट्टल गुन्हेगार मुल्ला कटर याला मदत करणारा पोलिस निलंबित | पुढारी

श्रीरामपूर : अट्टल गुन्हेगार मुल्ला कटर याला मदत करणारा पोलिस निलंबित

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : मुल्ला कटर या अट्टल गुन्हेगाराला मदत करणार्‍या श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल सुनील दिघे याला जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी निलंबित केले. याच प्रकरणात यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप व पोलिस नाईक पंकज गोसावी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अट्टल गुन्हेगारांशी पोलिसांचे असलेले आर्थिक हितसंबंध आता उघड झाले आहे. श्रीरामपूर शहरातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्या बरोबर निकाह केला. सलग तीन वर्षे मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपी मुल्ला कटर याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी मुल्ला कटर याला श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक पंकज गोसावी, सुनील दिघे हे मदत करून फिर्यादी लोकांवर फिर्याद मागे घेण्याबाबत नेहमीच दबाव आणत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे केली होती.  या तक्रारीची दखल घेत पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यामार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणाची मुल्ला कटर हा सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याने अजून किती मुलींना फसविले, याची माहिती पोलिस घेत आहेत.

Back to top button