आरोपीकडे नागेबाबा पतसंस्थेच्या कर्ज पावत्या, पोलिसांच्या झाडाझडतीत केल्या हस्तगत; तपास सुरू | पुढारी

आरोपीकडे नागेबाबा पतसंस्थेच्या कर्ज पावत्या, पोलिसांच्या झाडाझडतीत केल्या हस्तगत; तपास सुरू

नगर, पुढारी वृत्तसेवा: नगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. आरोपींच्या घरात शहर सहकारी बँकेसोबतच नागेबाबा पतसंस्था व महात्मा फुले पतसंस्थेच्या कर्ज पावत्या पोलिसांना मिळाल्या. नगरमध्ये बनावट सोनेतारण कर्जाची व्याप्ती वाढत असून मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे समोर येवू पाहत आहे. शहर सहकारी बँकेत पाच हजार 926 ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून दोन कोटी 20 लाख 13 हजार रूपयांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (वय 33, रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (वय 28), ज्ञानेश्वर रतन कुताळ (वय 28 दोघे रा. चिपाडे मळा, सारसनगर) सुनील ज्ञानेश्वर अळकुटे (वय 38 रा. सदगुरु टॉवर्स, तपोवन रोड, सावेडी), श्रीतेज पान पाटील (रा. भिंगार) व संदीप कदम (रा. निमगाव वाघा, ता. नगर) अशा सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपी 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

तसेच पोलिसांनी मुख्य सुत्रधार गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले याच्या केडगाव येथील गाळ्यातून बनावट हॉलमार्क मशीन जप्त केले आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी पाच हजार 926 ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून दोन कोटी 20 लाख 13 हजार एवढी रक्कम कर्ज स्वरूपात उचलत बँकेची फसवणूक केली आहे. आरोपींच्या घरझडतीमध्ये शहर सहकारी बँक, नागेबाबा पतसंस्थेच्या केडगाव शाखेच्या तसेच महात्मा फुले पतसंस्थेच्या आलमगिर शाखेतील कर्ज पावत्या पोलिसांच्या हाती लागल्या. त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत.

17 खातेदारांच्या ठेवी बनावट

आरोपींनी इतर खातेदारांच्या नावावर बनावट सोनेतारण ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये उस्मान अजिज तांबोळी, साजीद अजित तांबोळी, जैन्नुद्दीन पापामिया पठाण, अभिषेक पांडुरंग चौगुले, राहुल सुधाकर शिंदे, यासिन नासर आरब, वसीम निसार शेख, अनिल मल्लेश दिकोंडा, दीपक विरबहाद्दुर राजपूत, महेश प्रदीप पालवे, मयुर सुरेश बुळे, सतीश रामदा पडोळे, कालीदास सोन्याबापू कोकरे, विराज सुनिल ढोरे, संदीप सीताराम कदम, चेतन चोरडीया, अल्का चोरडिया या खातेदारांच्या ठेवी बनावट असल्याचे समोर आले आहे.

Back to top button