शिर्डी : साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; आठ आठवड्यात नियुक्तीचे शासनाला आदेश | पुढारी

शिर्डी : साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; आठ आठवड्यात नियुक्तीचे शासनाला आदेश

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाने नेमलेले साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ हे बेकायदेशीर आहे. अशी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून येत्या आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ घोषित करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती याचिकाकर्ते यांच्या वतीने अँड.अजिंक्य काळे यांनी दिली आहे.

साईबाबा संस्थानची नियुक्ती ही ठाकरे सरकारच्या काळात करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती शासन नियमप्रमाणे नाही म्हणुन याचिकाकर्ते उत्तम रंभाजी शेळके यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यायालयाने हा निकाल दिला

. या निकालात पुढे असे म्हटले आहे की, बरखास्त विश्वस्त मंडळानंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश, जिल्हाधिकारी, आणि संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ही त्रिसदस्यीय समिती कारभार पाहणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने आठ आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ नेमावे अशी माहिती अँड. काळे यांनी दिली आहे.

Back to top button