जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू | पुढारी

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू

नगर :  पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात 6 सप्टेंबरपासून कलम 144 लागू केले आहे. हा आदेश दोन महिने लागू असणार आहे.

घरमालक, लॉजमालक, सायबर कॅफेचालक वा मालक, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस वा ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते व जूने वाहन खरेदी-विक्री करणार्‍या दुकानदारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे, दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लागू करण्यात आले आहेत. संशयास्पद, अनोळखी व्यक्तींची माहिती न लपविता ती तत्काळ पोलिस प्रशासनाला देण्यात यावेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणेसह सर्व घटकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

Back to top button