नगर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित क्षेत्र दुपटीने वाढले | पुढारी

नगर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित क्षेत्र दुपटीने वाढले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टीमुळे 1 हजार 320 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 21 हजार 440 शेतकर्‍यांना बसला आहे. या बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई नवीन निकषानुसार होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 4 कोटी 25 लाख 92 हजार रुपयांचा निधी मागविला आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास आतापर्यंत बाधित शेतकर्‍यांना जिरायती पिकांसाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी 13 हजार 500 रुपये, तर बहुवार्षिक पिकांच्या 18 हजार हेक्टर प्रति हेक्टर अनुदान दिले जात होते.

या नुकसानभरपाईच्या निकषात भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारने दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे जिरायती पिकांसाठी आता 13 हजार 600 रुपये, बागायती पिकांसाठी 13 हजार 500 रुपये, तर बहुवार्षिक पिकांच्या 18 हजार हेक्टर प्रति हेक्टर अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण 43 गावांतील शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जून महिन्यात 109.99 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. जुलै महिन्यात 432.82 हेक्टर तर ऑगस्ट महिन्यात 759.99 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकर्‍यांना नवीन दरानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने दिला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 4 कोटी 25 लाख 92 हजार रुपये निधी मागविला आहे. निधी मिळताच शेतकर्‍यांना रक्कम मिळेल.

जून महिन्यातील नुकसान
तालुका शेतकर्‍यांची संख्या बाधित क्षेत्र(हेक्टर)
जामखेड : 62 2.93 हेक्टर क्षेत्र,
श्रीगोंदा : 45 8.87 हेक्टर क्षेत्र,
शेवगाव : 23 5.3
संगमनेर : 314 109.99
जुलै महिन्यात झालेले नुकसान
अकोले : 19,319 432.82
ऑगस्ट महिन्यात झालेले नुकसान
नगर : 3 1 हेक्टर
राहुरी : 409 234.24
कोपरगाव : 1171 490.35
राहाता : 64 34

Back to top button