साकेगाव महिलांची दारुविक्री विरोधात वज्रमूठ, विक्रेत्यांकडून महिलांना धक्काबुक्की; पाथर्डी पोलिसांना दिले निवेदन | पुढारी

साकेगाव महिलांची दारुविक्री विरोधात वज्रमूठ, विक्रेत्यांकडून महिलांना धक्काबुक्की; पाथर्डी पोलिसांना दिले निवेदन

कोरडगाव, पुढारी वृत्तसेवा: साकेगाव (ता.पाथर्डी) येथील महिलांच्या पुढाकारातून दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रशासनास हा ठराव पाठविण्यात आला होता, तरीही गावात अवैध दारुविक्री सुरूच असल्याच्य निषेधार्थ महिलांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावून निषेध व्यक्त केला. यावेळी गावातील जवळपास 70 महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी दारुविक्रेत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी महिलांना धाक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकले. संतप्त महिलांनी आपला मोर्चा ग्रामसेवकासह पोलिस ठाण्याकडे वळविला. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना संबधित दारुविक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

साकेगावात अनेक दिवसांपासून अवैद दारुविक्री सुरू आहे. चितळी रस्त्यावरील टपरीत दारू विक्री सुरू होती. या टपरीच्या जवळच एक विद्यालय आहे. मद्यपी विद्यार्थ्यींनी व महिलांना त्रास देतात. यामुळे अनेक कुटुंबे उध्दवस्थ झाली असून, तरुण आणि अल्पवयीनही दारुच्या आहारी गेले आहेत. दारुमुळे घरगुती हिंसाचारांच्या घटनेतही वाढ झाली आहे. कर्जाचे प्रमाणाही वाढले आहे. तसेच, महिलांना छेडछाड, दुसर्‍या गवातीलही मद्यपी गावात येतात. शेतकर्‍यांच्या घरात चोरी करून मद्यपी अपली नशा भागवितात. याविरोधात अनेक वेळा अर्ज करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. यावेळी रुकसाना शेख, शिवगंगा वाघ, स्वाती दुधाळ, ज्योती दुधाळ, मनीषा दुधाळ, सूवर्णा तांबे, ज्योती तांबे, सविता तुपसौदर, कमल गोरे, आशा दुधाळ, मुक्ता गमे, केशर चन्ने, लता देवढे, माया बळीद, ताराबाई आमले, सुनीता सातपुते, अनिता सातपुते, सविता सातपुते, मंदा सातपुते, लता गायकवाड, रंजना पठारे, नवाबी शेख, राधा पठारे आदींनी पोलिसांना निवेदन दिले.

ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले ताळे

सर्व प्रकाराच्या विरोधात जवळपास 70 महिलांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोनल करत कार्यालयास कुलुप ठोकले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश कायंदे, अनिल बडे, अमोल कर्डिले, संजय बडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर महिलांनी पाथर्डीला जात पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांची भेट घेवून दारुविक्री बंदीची मागणी केली. यावर पोलिसांनी या दारुविक्रेत्यांना तत्काळ नोटीस पाठविली आहे.

Back to top button