राहुरी: खोटे गुन्हे खपविले जाणार नाहीत: थोरात | पुढारी

राहुरी: खोटे गुन्हे खपविले जाणार नाहीत: थोरात

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: आंबेडकर चळवळीतील कोणत्याही गटातटाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असा खणखणीत इशारा राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनत म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीच प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण हे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी असून त्यांनी नेहमीच अन्याय अत्याचराविरुद्ध सातत्याने आवाज उठवण्याचे काम केलेले आहे. केवळ द्वेषापोटी त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठीच त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.

आर. पी. आय चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही गटातटाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले यापुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत. शेवगाव येथील पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी केवळ द्वेष भावनेतून आकसापोटी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते त्यांनी तत्काळ मागे घ्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी असून ती मान्य न झाल्यास आमचे कार्यकर्ते आरपीआयच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तहसील कचेरी, पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून शेवटी जिल्हाधिकारी यांच्या कार्याल्यावरही भव्य मोर्चा लवकरच काढला जाईल. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकार्‍याची राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात तालुका अध्यक्ष विलास साळवे, सिद्धांत सगळगिळे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे, मयूर कदम, माउली भागवत, आयुब पठाण, बाळासाहेब पडागळे, दादू साळवे, किरण साळवे, नवीन साळवे, राजू दाभाडे, रवींद्र शिरसाठ, सूरज साळवे, भाऊसाहेब साळवे, भूषण साळवे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button