रस्त्याच्या वादातून दोन गटांत तुफान राडा; नगर तालुक्यातील शेंडीमधील प्रकार | पुढारी

रस्त्याच्या वादातून दोन गटांत तुफान राडा; नगर तालुक्यातील शेंडीमधील प्रकार

नगर; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शेंडीत दोन गटांत रस्त्यांच्या वादातून तुफान राडा झाला. एका गटाने दोघांच्या डोक्यावर सत्तुराने वार करून जखमी केले. मंदिरावर दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 17 जणांवर गुन्हा दाखल केला असून 12 जणांना अटक केली आहे. करण देठे, जिवन वाकडे, नंदु वाकडे, आकाश गायकवाड, अक्षय गायकवाड, जय बागुल, बबलू जाधव, सोन्या दिनकर देठे, विशाल देठे, सुरेश भाऊराव देठे, ऋषिकेश देठे, बाळु शालुमन देठे, दिनकर देठे, सुभाष गायकवाड (सर्व रा. शेंडी) अशी आरोपींची नावे आहेत. गणेश गोरख ससाणे (वय 32, रा. शेंडी) यांनी फिर्याद दिली आहे.

गौराई यात्रेच्या दिवशी जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून रविवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास दोन गटांत तुफान राडा झाला. आरोपी करण देठे याने बॉबी नेटके व आकाश जाधव या दोघांच्या डोक्यात सत्तुराने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर या भांडणाचे रुपांतर दगडफेकीत झाले. लक्ष्मीमाता मंदिरावर दगडफेक करत जमावाने पुतळ्याचे नुकसान केले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. पुढील तपास फौजदार चांगदेव हंडाळ करत आहेत.

गावात पोलिस बंदोबस्त तैणात
दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर मंदिरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश देत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले. गावात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

शेंडीत झालेल्या दगडफेकीनंतर 17 जणांवर गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावात पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे.
                                                           – युवराज आठरे
                                                  पोलिस निरीक्षक, एमआयडीसी

Back to top button