संगमनेर : करुणा मुंडेनीच केली भारत भोसले ची 34 लाख रुपयांची फसवणूक | पुढारी

संगमनेर : करुणा मुंडेनीच केली भारत भोसले ची 34 लाख रुपयांची फसवणूक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांना नवा पक्ष काढायचा होता. त्यासाठी ४० लाख रुपयांची गरज होती म्हणून संगमनेर तालुक्यातील कोंची येथील भारत संभाजी भोसले यांना अंधारात ठेवून ३४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी केलेल्या चौकशीनंतर समोर आले. करुणा मुंडेवर अखेर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगोदर करुणा मुंडे यांनी भारत भोसले वर आणि आता भारत भोसलेने करुणा मुंडेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील कोंची येथील रहिवासी असणारा भारत भोसले यांच्याकडून करुणा मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्याकरिता 40 लाख रुपये घेतले विद्या संतोष अभंग यांच्या मालकीचा घुलेवाडीचा बंगला पक्षाच्या कार्यालययासाठी राहील असे दाखविण्यासाठी साठे खत करून नोंद करण्यात आली होती विद्या अभंग यांना करुणा मुंडे हिने 20 लाख इतकी रक्कम उसनवार पावती दस्ताने आदा केली. त्या बदलयात आयसीसी बँकेचे दोन कोरे चेक घेतले होते. करुणा मुंडे पक्ष काढत नाही असे भोसले आणि अभंग यांच्या लक्षात आले त्यानंतर या सर्वांनी मुंडे यांच्याकडे पैशाची मागणी केली. असता त्या म्हणाल्या की, इतक्या लवकर पक्षाची नोंदणी होत नाही.

जर तुम्ही पक्ष काढला नाही मग तुम्ही ३४ लाख 45 हजार रुपये कशासाठी घेतले होते असे म्हणून भोसले यांनी करुणा मुंडे यांच्या कडे पैशाची मागणी केली असता मुंडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर भारत भोसले यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना सांगितले तर हा दिवाणी न्यायालयाचा विषय आहे असे सांगितले गेले आणि उलट माझ्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अशी तक्रार भोसले यांनी केली. या प्रकरणात न्याय मिळण्याकरिता भोसले यांनी पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्याकडे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. पोलीस उपधीक्षक राहुल मदने यांनी चौकशी केलीअसता या प्रकरणात करुणा मुंडे यांनीच भारत भोसले यांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत भारत भोसले यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी करुणा धनंजय मुंडे शर्मा हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. याबाबतचा अधिक तपास प्रभारी सहाय्यक पो नि राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे

Back to top button