पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा | पुढारी

पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : सुवर्णयुग तरूण मंडळ सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून पाथर्डी शहरातील शेवाळे गल्ली येथील मंडळाची शुक्रवारी रात्रीची आरती व पुजा शहरातील अभियंता शाहरुख शेख यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. मंडळामध्ये अनेक मुस्लिम सभासद असून मंडळाच्या प्रत्येक सामजिक, विधायक कार्यात तन, मन, धनाने कार्यरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येक गणेशोत्सवाच्या काळात मुस्लिम सभासद बाधवांच्या हस्ते आरती होते.

गणराया म्हणजे चैतन्याचे, उत्साहाचे प्रतीक असून सुवर्णयुग तरूण मंडळाच्या गणरायाला सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले जाते. मंडळ गेल्या गेल्या पंधरा वर्षांपासून आरती आणि पूजेचा मान देते. मंडळातील मुस्लिम समाजाचे सदस्य भक्तिभावाने दहा दिवस गणेशाची विधिवत पूजा करतात. त्यामुळे भक्तिचे एक वेगळे दर्शन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात पहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच प्रेम, एकता, बंधूता निर्माण करण्याचे एक माध्यम आहे, हे दिसून येते. मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र शेवाळे, वैभव शेवाळे, मुकुंद लोहिया, दिगंबर जोजारे, सतीश टाक, भैय्या गांधी, अमोल कांकरिया, ओम डागा, मोनल जोजारे आदी त्यासाठी पुढाकार घेतात.

Back to top button