मोक्कातील फरार आरोपीस कर्जतला अटक | पुढारी

मोक्कातील फरार आरोपीस कर्जतला अटक

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाण करून किमती ऐवज लुटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये अर्थात मोक्कांतर्गत गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांनी शिताफीने अटक केली. शशिकांत सावता चव्हाण (रा. आंबीजळगाव, ता. कर्जत) याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. तेव्हापासून तो फरार होता. या गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील हे करीत आहेत. त्यांनी आरोपी शशिकांत चव्हाण याला अटक करण्यासाठी कर्जत पोलिस ठाण्याला वॉरंट पाठविले होते, तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनीदेखील आरोपी शशिकांत चव्हाण याला अटक करण्यासाठी वेळोवेळी कर्जत पोलिसांशी संपर्क साधला होता.

त्यानुसार कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांना आरोपी शशिकांत चव्हाण याला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी पाळत ठेवून दि. 30 ऑगस्ट रोजी आरोपी शशिकांत चव्हाण याला अटक केली. तो भांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे त्याला सापळा लावून पकडण्यात आले. पुढील तपास कामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे, अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, ईश्वर माने, अमित बर्डे, मनोज लातूरकर, शकील बेग आदींनी केली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहेत.

Back to top button