काष्टी: महाराष्ट्र एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न

काष्टी: महाराष्ट्र एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न

काष्टी, पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर-गोंदिया ही महाराष्ट्र एक्सप्रेस मध्यरात्री क्रासिंगला थांबली असताना दहा ते पंधरा अज्ञातांनी बोगीतील दोन डब्यावर दगडफेक करत प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिस संजय वामन पाचपुते, स्टेशन मास्तर रविंद्र पंडित,व गार्ड यांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्र एक्सप्रेस लुटीचा प्रयत्न फसला. घटनेनंतर श्रीगोंदा पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला पण ते पसार होण्यात यशस्वी झाले.

सोमवारी (दि.29) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दौंडकडून नगर-मनमाडकडे जाणारी कोल्हापूर-गोंदिया ही महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर क्रासिंगला 13 मिनिटे थांबली होती. त्यावेळी दोन बोगीमध्ये (डब्यावर) अंधारातून दगडफेक झाली. दहा ते पंधरा चोरटे गाडीवर चढून लटकले. हे दृश्य गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्टेशनमास्तर रविंद्र पंडित यांना माहिती कळविली. रेल्वे पोलिस संजय पाचपुते यांना माहिती मिळताच ते तातडीने रेल्वेच्या शेवटबाजुकडील डब्याकडे धावले. पोलिस येत असल्याचे चाहूल लागताच चोरटे अंधारात शेजारच्या शेतातून पसार झाले. संजय पाचपुते यांनी श्रीगोंदा पोलिसांना घटनेची माहिती कळविताच उपनिरिक्षक समीर अंभग पथकासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी आसपास पाहणी केली, पण चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांत याबाबत कुठलीच नोंद दुपारपर्यंत झाली नव्हती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news