नगर : राज्यपालांच्या हस्ते होणार विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपूजन | पुढारी

नगर : राज्यपालांच्या हस्ते होणार विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपूजन

नगर, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे साकारत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी उपकुलगुरु संजय सोनवणे यांनी नुकतीच केली.

दि. 6 सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी बाबुर्डी घुमटला भेट देऊन नियोजित उपकेंद्राच्या जागेची पहाणी केली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नमिता पंचमुख व उपसरपंच तानाजी परभणे यांनी उपकुलगुरू सोनवणे यांचा सत्कार केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब परभणे, सोनू मुंजाळ, पवन लांडगे, भाऊसाहेब लांडगे, रामलाल मोरे, महादेव गवळी, राहुल पंचमुख, संतोष चव्हाण, पोपट चव्हाण, शरद भगत, अंकुश परभणे, सुभाष परभणे, बन्सी परभणे, संजू गुंड, संदिप परभणे, बाळासाहेब परभणे, गंगाधर कोतकर आदींसह बाभुर्डी घुमटचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनेद उपस्थित होते.

उपसरपंच तानाजी परभणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीसाठी बाभुर्डी घुमट ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सहकार्य राहणार असल्याचे यावेळी सांगितले. उपकुलगुरू संजय सोनवणे यावेळी म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी तीन कोटींचा निधी शासनाकडून मिळाला आहे. आगामी दोन ते तीन वर्षांमध्ये सुमारे शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा आणखी भारघोस निधी येणार असून, त्या माध्यमातून बाबुर्डी घुमटचे पूर्ण स्वरूप बदलणार आहे.

आगामी काळात शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येणार असून, गावाच्या विकासासाठी देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुळा धरणाचे पाणी गावाला मिळण्यासाठी नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव असून, याबाबत विद्यापीठ स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच मुळा धरणाचे पाणी बाभुर्डीमध्ये येईल, असे त्यांनी सांगितले.

Back to top button