राहुरी : अल्पवयीन मुलीसह तरुणीचा विनयभंग

राहुरी : अल्पवयीन मुलीसह तरुणीचा विनयभंग

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील गुंजाळे शिवारामध्ये एका 27 वर्षीय तरूणीचा, तर म्हैसगाव परिसरात एका 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंजाळे परिसरामध्ये 27 वर्षीय तरूणी रस्त्याने जात असताना सुरेश हनवट याने रस्त्यामध्ये अडवित अश्लिल हावभाव करीत तिच्याशी दुष्कृत्य केले. याप्रकाराबाबत पीडित तरूणीने वजीर गंगाराम घनवट व मीरा वजीर घनवट यांना माहिती सांगितली. संबंधितांनी तरूणीला अत्याचार करून जीव घेऊ, असे सांगत शिवीगाळ केली.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात संबंधित तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार दिनकर चव्हाण हे तपास करीत आहेत. म्हैसगाव परिसरात एका 13 वर्षीय बालिकेसमोर लघवी करीत अश्लिल हावभाव केल्याची दुसरी घटना घडली. या प्रकरणाबाबत आरोपी हरिभाऊ साळवे याने दारू पिऊन, 'तुझ्या आजीने माझ्या विरोधात तक्रार का केली,' असे विचारत साळवे याने अश्लिल शिवीगाळ करीत लज्जा उत्पन्न होईल, असे गैरकृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोखे तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news