नगर : शहरातील उड्डाणपुलाचे दिवाळीत लोकार्पण

नगर : शहरातील उड्डाणपुलाचे दिवाळीत लोकार्पण

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत भाजपचे महापौर व उपमहापौर असताना नगर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. विकासकामांची तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात येणार असून, शहरातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा दिवाळीच्या दिवशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नगर शहरातील मिसाळ गल्ली येथे काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, धनंजय जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे हे उपस्थित होते. खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, नगर शहरात विकासकामे सुरु आहेत. नागरिक विकासकामांचे साक्षीदार आहेत. ढोणे यांच्या वार्डातील विकासकामासाठी साडेतीन कोटीचा निधी देण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेच्या हद्दीतील विविध वॉर्डात 50 ते 60 कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम भाजपचे महापौर व उपमहापौर असतानाच सुरू झाले. दिवाळीच्या दिवशी या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केला जाणार आहे. आगामी सहा महिन्यांत शहरातील विकासकामांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news