पाथर्डीत प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा, आ. प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध | पुढारी

पाथर्डीत प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा, आ. प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार संजय माळी यांना निवेदन देण्यात आले. निवडणुकीत बीएलओ म्हणून कराव्या लागणार्‍या कामावर बहिष्कार घालण्याचा सामूहिक निर्णय शिक्षकांनी घेतला. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होत प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांनी विविध घोषवाक्ये असलेले फलक हातात घेऊन आ. बंब यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.

प्राथमिक शिक्षकांवर शैक्षणिक कामाव्यतिरिक्त दिले जाणारे अतिरिक्त काम त्वरित बंद करण्याची मागणी यावेळी शिक्षकांनी केली. संतप्त शिक्षकांनी आमदार बंब यांच्या फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यांनतर या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. यावेळी गाहिनीनाथ शिरसाट, अर्जुन शिरसाट, विजय अकोलकर, राजेंद्र जायभाये, कल्याण लवांडे, प्रशांत शेळके, सुरेश खेडकर, रामप्रसाद आव्हाड, संतोष अकोलकर, श्रीकृष्ण खेडकर, दीपक बडे, प्रशांत तुपे, प्रशांत शेळके, गंगाधर सुपेकर, संजीवनी दौंड, बाळासाहेब गोल्हार, सीमा पालवे, संतोष पालवे, विष्णू बांगर, ज्ञानदेव कराड, शिवाजी ढाकणे आदींसह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

Back to top button