पाथर्डी : रस्ता कामाच्या चौकशीसाठी घंटानाद, सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे

पाथर्डी : रस्ता कामाच्या चौकशीसाठी घंटानाद, सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिंचपूर इजदे ते जोगेवाडी रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी झाले असून, निकृष्ट कामामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम दर्जाहिन असून, या कामाची गुणनियंत्रणार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी पिंपळगाव टप्पा येथील ग्रामस्थांनी पाथर्डी येथील सावर्जनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन आंदोलन करीत अधिकार्‍यांचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनात पिंपळगाव टप्पाचे ग्रामस्थ संपत दराडे, विजय शिरसाट, नितीन शिरसाट, नारायण शिरसाट, रामदास शिरसाट, राजेंद्र शिरसाट, गणेश शिरसाट, अक्षय शिरसाट, संपत शिरसाट, नवनाथ वाघमारे, दीपक शिरसाट, उद्धव शिरसाट, विठ्ठल शिरसाट, रमेश शिरसाट, राजू निंबाळकर आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलन म्हणाले, चिंचपूर इजदे ते जोगेवाडी रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रणमार्फत चौकशी करावी. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे रस्त्याची कामाची गुणनियंत्रणमार्फत चौकशी होऊन संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

इतके निकृष्ट काम संबंधित ठेकेदारांकडून होत असताना आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम किंवा इतर कोणत्याही विभागाकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नाही. ठेकेदाराला पाठीशी घालत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही कारवाई ठेकेदारावर केली नाही. पूर्व भागातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता हा असून लाखो रुपये शासनाने यावरती खर्च केले आहे. काम सुरू असताना कोणत्याही राजकीय नेत्याने या कामावर लक्ष दिले नाही.

फक्त नारळ वाढवून काम मंजूर केल्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. खड्ड्यांमुळे अपघात होतात लोकांचा जीव जातो. अशा परिस्थितीत राजरोजपणे ठेकेदार मनमानी कारभार करून निकृष्ट काम माथी मारल्या जात त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग चक्क डोळे झाकून बसले आहे. येथील अधिकारी फक्त जागेवर बसून कामे करतात. प्रत्यक्षात कामाची पाहणी करत नाहीत, म्हणून असे निकृष्ट काम तालुक्यात होत आहे.

लाखो रुपये शासन रस्त्यांच्या कामासाठी देते, पण अधिकारी यात आर्थिक गोडबंगाल करतात. त्यामुळे अशी परिस्थिती ग्रामीण भागातील कामे निकृष्ट होत आहेत. या कामाची चौकशी झाली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सुस्थितीत रस्ता करून देण्याचे आश्वासन!
या रस्त्यावर काही ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने, तसेच मागील महिन्यात भीज पाऊस असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सदर कामाचा दोषदायित्व कालावधी हा दोन वर्षांचा आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदार ही संबंधित ठेकेदाराची आहे. परंतु, सद्यस्थितीत पाऊस चालू असल्याने रस्त्यावरील खड्डे डांबराने भरणे शक्य होणार नाही. 10 ऑक्टोबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे डांबराने भरून रस्ता सुस्थितीत केला जाईल. तोपर्यंत येत्या आठ दिवसांत रस्त्यावरील आवश्यक त्या ठिकाणी मुरुमाने खड्डे भरून रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यात येईल, असे लेखी आश्वासन बांधकाम विभागाकडून आंदोलकांना देण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news